Aurangabad

शिवाजी महाराज स्मारक उभारणी प्रक्रिया गतीमान करावी – जिल्हाधिकारी…

शिवाजी महाराज स्मारक उभारणी प्रक्रिया गतीमान करावी – जिल्हाधिकारी…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे जाणता राजा शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या आढावा बैठकीत चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी आ.आंबादास दानवे, सिल्लोड उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भगत, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी स्मारकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि अभ्यासक, पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने करण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आ.दानवे, उपाध्यक्ष सत्तार यांच्यासह समिती सदस्यांनी यावेळी स्मारक निर्मितीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button