Nashik

दिंडोरी तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

दिंडोरी तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

सुनील घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात जानोरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व त्यांनी कशा पद्धतीने काम केले याबाबत अनेकांनी आपले विचार व्यक्त केले तसेच शिवक्रांती मित्र मंडळाच्या शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सोहळा पूजन करून काढण्यात आला गावात पालखी मिरवणूक घेऊन पुना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती होऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी छत्रपतींच्या विचारा संदर्भात पूजा रघुनाथ घुमरे हिने छत्रपतींचा जन्मापासून आजपर्यंतचा इतिहास साक्षात जमलेल्या लोकांच्या नजरेस उतरवला जिल्हा परिषद शाळा जानोरी येथील विद्यार्थ्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या संदर्भात विचार मांडले तसेच शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने गड किल्ले ताब्यात घेतले याबाबत कलागुण मधून आपले शिवप्रेम जनतेच्या नजरेस आणून दिले प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे माजी उपसरपंच गणेश तिडके विष्णुपंत काठे पोलीस पाटील सुरेश घुमरे संदीप घुमरे अरुण घुमरे ज्ञानेश्वर दवणे योगेश गोजरे सोमनाथ घुमरे राहुल घुमरे बापू घुमरे योगेश तिडके शरद काठे दशरथ विधाते निवृत्ती काठे दत्तात्रेय काटे पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच दिंडोरी शहर अक्राळे मोहाडी जवळके खडक सुकेना चिंचखेड मातेरेवाडी यासह पुर्ण तालुक्यामध्ये विविध संस्था जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून मानवंदना करण्यात आली
यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने पीआय प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुंडे बाळा पानसरे बंदोबस्त पार पाडला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button