Shirdi

?शिर्डी ड्रेस कोड प्रकरण..तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात, शिर्डीत जाण्यापासून रोखले

?शिर्डी ड्रेस कोड प्रकरण..तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात, शिर्डीत जाण्यापासून रोखले

शिर्डी भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डीमध्ये जाण्यापूर्वीच सूपा टोलनाका येथे पोलिसांनी ताब्यात घेतले असून सूपा पोलिस ठाण्यात त्यांना बसून ठेवण्यात आले आहे.

शिर्डी साई संस्थानने साई मंदिर परिसरात भक्तांनी भारतीय संस्कृतीस अनुसरून वेशभूषा परिधान करण्याचे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. संस्थानच्या ड्रेस कोड सुचनेला विरोध करत भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी संस्थानने लावलेले फ्लेक्स बोर्ड तत्काळ काढावे अन्यथा शिर्डी मंदिर परिसरात येऊन बोर्ड काढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी ११ डिसेंबरपर्यंत तृप्ती देसाई यांना शिर्डीमध्ये प्रवेश बंदीची नोटीस दिली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button