Delhi

शशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…

शशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबत सेल्फी व्हायरल… कप्शनमुळे वादात..मागितली माफी…

दिल्ली काँग्रेस नेते शशि थरूर आता नव्या वादात अडकले आहेत शशी थरूर यांनी 6 महिला खासदारांसोबत चा सेल्फी फोटो इन्स्टाग्राम वर शेअर करत कप्शन लिहल आहे त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.सोशल मीडियावरील टीकेनंतर थरूर यांनीही दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिल आहे.

काय आहे प्रकरण..

हिवाळी अधिवेशनाच्या ठीक एक दिवस आधी शशी थरूर यांनी 6 महिला खासदारांसोबत चा फोटो व्हायरल करत त्यावर कोण म्हणतं की लोकसभा काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं कप्शन लिहिले आहे. यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

थरूर यांच्या या सेल्फीमध्ये काँग्रेसच्या खासदार परनीत कौर आणि जोथिमनी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेच्या खासदार थमिजाची थंगापांडियन दिसत आहेत. थरूर यांनी हा सेल्फी ट्विट केला आणि ‘कोण म्हणतं की लोकसभा हे काम करण्यासाठी आकर्षक ठिकाण नाही? आज सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत असं म्हटलं आहे.

थरूर यांच्या या पोस्टवर अत्यन्त कडक व स्पष्ट प्रतिक्रिया युजर्स नी दिल्या आहेत.एका यूजरने म्हटलं आहे की, महिला तुमच्या कामाच्या ठिकाणाला आकर्षक करण्यासाठी लोकसभा सजवण्याची वस्तू नाही. त्या खासदार आहेत आम्ही तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. अन्य एका यूजर ट्विट करत म्हटलं की, तुम्ही जर अन्य सेक्टरमध्ये असता तर आकर्षक म्हणल्यामुळे तुम्हाला काढून टाकलं गेलं असतं. तर काहीनी थरूर यांच्या बाजूने मते मांडली आहेत.

थरूर यांनी मागितली माफी

सोशल मीडियावर सुरु झालेल्या टीकेनंतर थरुर यांनी याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. सेल्फीची सगळी गोष्ट महिला खासदारांच्या पुढाकाराने मोठ्या विनोदात करण्यात आली होती. त्यांनीच मला सांगितलं होतं की त्याच भावनेने ती पोस्ट करा. पण मी क्षमस्व आहे की काही लोक नाराज झाले आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी असलेल्या सौहार्दाच्या या सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मला आनंद झाला. इतकंच आहे असं थरूर यांनी म्हटलंय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button