Bollywood

राजकुमार राव चा लग्ना नंतर चा पहिला फोटो शेअर..!

राजकुमार राव चा लग्ना नंतर चा पहिला फोटो शेअर..!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावचा पत्रलेखासोबत नुकताच चंदीगड येथे विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पत्रलेखा आणि राजकुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पत्रलेखा आणि राजकुमार यांच्यासोबतचा फोटो नुकताच मनोहर लाल खट्टर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून मनोहर लाल खट्टर यांनी लिहीले, ‘चंदीगडमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावून वर आणि वधूला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.’ मनोहर लाल खट्टर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा रॉयल लूकमध्ये दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button