World

Shane Warne: 700 पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या शेन ची आचनक एक्झिट..!ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन..हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास

Shane Warne: ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन..हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास

तब्बल ७०० हून अधिक विकेट्स नावावर

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नमध्ये ९० अंशामध्ये चेंडू वळविण्याची क्षमता होती. ऑस्ट्रेलिया संघात ग्रेन मॅक्ग्राथ, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली यांच्यासारखे वेगवान आणि धारदार गोलंदाज असताना शेन वॉर्नने आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलिया क्रिकेटची १५ वर्ष गाजवली. तब्बल ७०० हून अधिक विकेट्स त्यांनी आपल्या नावे केल्या.

शेन वॉर्नच्या व्यवस्थापन टीमने काय माहिती दिली?

शेन वॉर्न मृत्यूवेळी त्यांच्या बंगल्यात होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि पुढच्या काही मिनिटांतच त्यांना मृत्यूने गाठलं. पण तत्पूर्वी त्यांना वाचविण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण डॉक्टर अपयशी ठरले. एका जगविख्यात फिरकीपटूला क्रिकेट जगत मुकलं.

वॉर्नच्या फिरकीच्या तालावर भले भले फलंदाज नाचायचे!

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या फिरकीच्या तालावर क्रिकेटचा देवही नाचायचा. भल्या भल्या फलंदाजांना वॉर्नची भिती वाटायची. वॉर्नने आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीत 708 फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याचबरोबर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 293 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरणच्या ८०० विकेट्सच्या विक्रमानंतर शेन वॉर्नचा नंबर लागतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button