World

Shane Warne:शेवटचं श्रद्धांजली ट्विट आणि स्वतः च घेतला जगाचा निरोप..

Shane Warne:शेवटचं श्रद्धांजली ट्विट आणि काही तासांत शेन वॉर्न ने घेतला जगाचा निरोप..

ऑस्ट्रेलिया मृत्यूच्या काही तासांअगोदर शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज लेग स्पिनर रॉड मार्श यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारं ट्विट केलं. अन् पुढच्या काही तासांतच वॉर्न यांनी जगाचा निरोप घेतला.संपूर्ण खेळ जगतात शोक कळा पसरली असून शेन हा अत्यन्त गुणी खेळाडू होता.त्याला भारताबद्दल विशेष प्रेम होतं.

शेन वॉर्न मृत्यूसमयी थायलंडमध्ये होते. ते त्यांच्या बंगल्यामध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. वॉर्न यांचा मृतदेह त्यांच्या बंगल्यामध्ये मिळाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना वाचविण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आलं नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘वॉर्न मृत्यूच्या वेळी थायलंडमध्ये होते’. वॉर्नच्या अचानक जाण्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटला तसंच जागतिक क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button