Nashik

शक्तिपीठ श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ५ बायपॅप मशिन उपलब्ध करुन देण्याबरोबरच गरजू ग्रामस्थांना मोफत अन्नक्षेत्र उपलब्ध करून देनार.

शक्तिपीठ श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ५ बायपॅप मशिन उपलब्ध करुन देण्याबरोबरच गरजू ग्रामस्थांना मोफत अन्नक्षेत्र उपलब्ध करून देनार.

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी सप्तशृंग गड एक आद्य स्वयम शक्तीपिठ या शक्तीपिठाचा कारभार मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्या अखत्यारीत असुन कळवण तालुका तहसिलदार हे पदसिध्द विश्वस्त असुन इतर नियुक्त पाच विश्वस्त प्रतिनिधी मार्फत या विश्वस्त संस्थेचा कारभार चालतो. जगभर थैमान घालणाऱ्या कोराना विषाणू संसर्गाची संभाव्य उपाययोजना म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने कोरोना विषाणु संसर्ग-आरोग्य जनजागृती अभियान गेल्या १ मार्च २०२० पासून सुरु केले असुन या अभियानाअतंगत कळवण तालुक्यातील शासकीय कर्मचारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ व भाविकांना प्रबोधन व्हावे म्हणुन मौजे सप्तशृंग गड व परिसरात कोरोना विषाणु जनजागृतीचे माहिती फलक लावण्यात आले . तसेच फेसबुक व व्हॉटसअॅप च्या माध्यमातून या आरोग्य अभियाना मार्फत स्थानिक ग्रामस्थ कर्मचारी व भावि कांना विश्वस्त संस्थेच्या धर्मार्थ रुग्णालयामार्फत मोफत वैद्यकीय उपचार रुग्णवाहीका, औषधे वाटप सुरु करण्यात आली असून, विश्वस्त संस्थेची रुग्णवाहीका २४ तास रुग्णांसाठी कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाईजर, विटॅमिन सी. इ. औषधे आदिचे वाटप देखील करण्यात आलेले आहे. शासनाच्या आदेशानुसार श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत सप्तशृंग गड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवातीस दि. १८ मार्च २०२० पासुन श्री. भगवती मंदिर भाविकांसाठी संपूर्ण बंद करण्यात आले होते. सप्तशृंग गडावरील रहीवाशी हे संपूर्ण भाविकांवर अवलंबून असल्याने सामाजिक दातृत्व म्हणुन स्थानिक नागरीकांचा रोजगार गेल्याने व आर्थिक तसेच उदरनिर्वाहा साठी विश्वस्त संस्थेने दि. ३० मार्च २०२० पासून ते १६ नोव्हेंबर २०२० पावेतो स्थानिक ग्रामस्थ, मजुर, कर्मचारी यांना दोन वेळेचे मोफत अन्नदान प्रक्रिया राबविली आहे. त्यात सुमारे १३०० ते १५०० दरम्यान ग्रामस्थ कर्मचारी व मजुर यांनी दररोज मोफत अन्नदानाचा लाभ घेतला आहे. तसेच सप्तशृंग गड क्षेत्र हे आदिवासी व निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी असणाऱ्या वन्यप्राणी यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने फळे, धान्य, पाणी इत्यादी सुविधा कार्यान्वीत केलेल्या आहेत.

केंद्र शासन व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा. धर्मदाय आयुक्त यांच्या आवाहनास सकारात्मक विचार करुन कोविड- १९ संबधीत सुविधा उपलब्ध करुन देणे कामी विश्वस्त संस्थेमार्फत रक्कम रु. २१०००००/- मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आलेली आहे.

कळवण येथिल आरोग्य विभाग, पोलिस विभाग व महसुल विभाग अंर्तगत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार मास्क, सॅनिटाईझर, हातमोजे इत्यादी साहित्याचे वाटप विश्वस्त संस्थेमार्फत करण्यात आले असून या सर्व कोराना विषाणू जनजागृती अभियानाअंर्तगत आतापावेतो विश्वस्त संस्थेने ५० ते ५२ लाख रुपये खर्च केलेला आहे. दि. २४/०४/२०२१ रोजी मा. धर्मदाय आयुक्त नाशिक प्रदेश नाशिक यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळ संस्थेमार्फत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नग २५ देणेबाबत विश्वस्त संस्था सकारात्मक आहे. मात्र सद्यस्थितीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध होत नाही मात्र लवकरच से उपलब्ध करुन देणेकामी, मा. धर्मदाय आयुक्त, नाशिक व मा. अध्यक्ष श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट हे एकत्र त्यासंदर्भात समन्वय साधत असून, सद्यस्थितीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा तुटवडा भासत असल्याने, ते लवकरच उपलब्ध करुन मा. जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचेकडेस सुपूर्त करण्यात येतील. तसेच कोरोना विषाणू संसर्ग असणाऱ्या रुग्णांकरीता ५ बायपॅप मशिन विश्वस्त संस्थेमार्फत खरेदी करून कळवण उपजिल्हा रुग्णालयास देण्याचे मा. अध्यक्ष विश्वस्त मंडळाने ठरविले असून, कळवण येथिल कोविड सेंटर करीता मा. तहसिलदार साहेब यांचेशी झालेल्या चर्चेनुसार आवश्यक त्या प्रसंगीअन्न पॅकेटस व पाणीपुरवठा करण्याचे विश्वस्त मंडळाने नियोजित केले असून, सद्यस्थितीत तालुक्यातील गोपाळखडी येथे कोविड सेंटर साठी मा. तहसिलदार सो, यांचे सुचनेनुसार विश्वस्त संस्थेकडुन गेल्या ८ दिवसांपासुन पाणीपुरवठा करीता टँकरची सुविधा करण्यात आलेली आहे. दि. २६ मार्च २०२१ पासून राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा सर्व धार्मिक मंदिरे बंद झाली आहेत. मौजे सप्तशृंग गडावरील स्थानिक रहिवाशी यांचा रोजगार संपुष्टात आल्याने, विश्वस्त संस्थेमार्फत सप्तशृंग गडावरील गरजू व्यक्तींना मोफत अन्नदान करण्याचे यापूर्वीच नियोजित केले होते मात्र विश्वस्त संस्थेच्या प्रसादालयातील विभाग प्रमुख, सुपरवायझर व मुख्य आचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे सदरचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र प्रसादालयातील सर्व परीसर, अन्नक्षेत्र हॉलचे सोडीयम हॅड्रोक्लोराईड द्वारे सैनिटाईजेसन करुन दि. ०२/०५/२०२१ ते १५/०५/२०२१ पावेतो स्थानिक गरजू व्यक्तींसाठी मोफत व इतर व्यक्तींसाठी रु. १०/- या अल्प दरात प्रसादालयात अन्नदान करण्याचे मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे नियोजन निर्धारीत आहे. भविष्यात कारोना विषाणू संसर्ग रुग्णांना विश्वस्त संस्थेमार्फत आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल असे आवाहन मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button