Mumbai

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू वर शहनाज गिलचा आक्रोश…

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू वर शहनाज गिलचा आक्रोश…शूटिंग सोडून निघून गेली…

मुंबई छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तो ४० वर्षांचा होता. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयाने दिली. सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून त्याची मैत्रिण आणि बिग बॉसमधील कोस्टार शेहनाज गिलला धक्का बसला आहे. ती चित्रीकरण करत असलेल्या सेटवरुन निघून गेली आहे.

सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी बिग बॉस १३ सिझन मध्ये घरात असताना चर्चेत होती. घरातून बाहेर पडल्यावर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शेहनाज किंवा सिद्धार्थने कधीही उघडपणे यावर वक्तव्य केले नाही. पण हे कपल सर्वांचे लाडके कपल होते. सोशल मीडियावर सिदनाज म्हणून हे कपल लोकप्रिय होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनीही डान्स दीवाने या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तसेच ते बिग बॉस ओटीटीमध्येही गेल्या आठवड्यात दिसले होते.
सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाजला मोठा धक्का बसला आहे. ती चित्रीकरण करत असलेल्या सेटवरुन निघून गेली आहे.

बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.सिद्धार्थला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button