Yawal

चुंचाळे यावल परिसरातील रुग्णसेवेत इंधनखर्चात दोन्ही चारचाकी वाहने सेवारत चुंचाळे येथील मिरखा तडवी परिवाराची निस्वार्थ रुग्णसेवा फक्त इंधन भरा व रुग्णालयात रुग्णांना दाखल करा

चुंचाळे यावल परिसरातील रुग्णसेवेत इंधनखर्चात दोन्ही चारचाकी वाहने सेवारत चुंचाळे येथील मिरखा तडवी परिवाराची निस्वार्थ रुग्णसेवा फक्त इंधन भरा व रुग्णालयात रुग्णांना दाखल करा

मुबारक तडवी यावल

यावल : जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्ल आदिवासी समाजात कोरोना संसर्गजन्य आजारात सुध्दा धडाडीचे कार्य करीत असल्याचे पहावयास मिळाले सर्वसामान्य असा हा मिरखा नुरखा तडवी हा समाजातील परिवार समाज गरजूंच्या मदतीला धावून आला , गावातील पेशंट यांना आता फक्त्त इंधन वर हॉस्पिटल साठी दोन्ही क्रुझरगाड्या मिळणार , कोरोना महामारी मुळे ऍम्ब्युलन्स ची कमतरता भासत आहे , गरजू पेशंट साठी प्रतिक्षेत न राहता वेळेवर गाडी उपलब्ध व्हावी यासाठी गावातील , मिरखा नूरखा तडवी यांनी आरोग्य सेवेसाठी हे पाऊल उचलले आहे , सध्या मुंबई महानगर पालिकेत मिरखा तडवी हे वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत , तडवी समाजाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी तडवी भिल समाज लाईफ लाईन अंम्बुलंन्स प्रतिनिधी , संचालक म्हणून ही सेवाकार्य करतात , गावातील आणी परिसरात समाजातील चांगल्या कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो , INTEL FORCE यांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरूणाने मदतीस बाहेर आले पाहिजे , आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनाच मदतीची गरज आहे मात्र ज्यांना शक्य होईल त्यांनी केली पाहिजे . या कार्याने गावात मिरखा तडवी यांची लोकांविषयी मदत बघून चर्चेला उधाण आले आहे आणि या निस्वार्थ सेवेबद्दल यावल तालुका परिसरात, समाजातील व गावात सर्वत्र मिरखा नुरखा तडवी परिवाराचे कौतुक होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button