Chalisgaon

चाळीसगाव येथे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान अंतर्गत मार्गदर्शन व विचार मंथन कार्यशाळा संपन्न तालुक्यातील पासष्ठ गावातील जलमित्रांचा होता सहभाग

चाळीसगाव येथे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान अंतर्गत मार्गदर्शन व विचार मंथन कार्यशाळा संपन्न तालुक्यातील पासष्ठ गावातील जलमित्रांचा होता सहभाग

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील गावांमध्ये मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाअंतर्गत जलसंधारण व पर्यावरण रक्षणासाठी भरीव असे काम होत आहे. या उपक्रमाअंतर्गत मागील वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतांना लोकसहभागातून सोळा गावांमध्ये नाला खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे एकशे दोन कोटी लिटर जलसाठा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षात मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तालुक्यातील जलमित्र परिवार चाळीसगाव तर्फे तालुक्यातील जलमित्रांना मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन रविवार दि.२० डिसेंबर रोजी राष्ट्रीय विद्यालयाच्या हॉलमध्ये करण्यात आले होते.
कार्यशाळेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने व मान्यवरांचे हस्ते द्विपप्रजलनाने झाली.
कार्यशाळेचे प्रशिक्षक डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण (भा.प्र.से.) याचे हस्ते जल चळवळीतील जलयोध्दे यांचे कुटुंबातील चि.तन्मय माळदकर यांची जे.ई.ऍडव्हान्स परिक्षेत आय.आय.टी.खडगपुर येथे प्रवेश मिळाल्याने व चि. सारिका शितोळे,तळेगाव हिला विद्यापीठातून इग्रंजी विषयात गोल्ड मेडल मिळाले बद्दल व विद्यापीठावर इग्रंजी विषय अभ्यासक्रमावर निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर कार्यशाळेचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण निकम सर होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन पाचपाटील टिमने तर प्रास्ताविक तुषार निकम सर यांनी केले. मान्यवर उपस्थिताचे स्वागत सविताताई राजपूत यांनी केले.
कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू केलेल्या मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान चळवळीला पाचपाटील टिमचे अथक परिश्रम व शेतकरी बांधवांच्या लोकसहभागातून यश मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. ही चळवळ पुढच्या वर्षी अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याचे नमुद केले. कार्यशाळेचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण निकम सर यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शनात सांगितले की, नाला खोलीकरणासोबतच गावाचे पाणलोट समजून घेणेही गरजेचे आहे, जलसंधारणात वृक्ष, जंगल व गवत यांचाही मोठा उपयोग होतो, पाण्याचे काम करणारा कार्यकर्ता हा विषमता पाळणारा नसावा, गाव म्हणजे कुटुंब समजून चालणारा असावा हे कार्यकर्त्याचे गुणविशेषही त्यांनी समजावले तसेच गौताळा अभयारण्यात केलेल्या पाणलोट उपचार करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने काम होणे आवश्यक आहे ते केल्याने पाटणादेवी व गौताळा अभयारण्यात वृक्षसंवर्धन, जैवविविधता समृद्ध झाले बाबत आपले अनुभव सांगितले.
कार्यशाळेस उपस्थित पाच पाटील आर.एम.पाटील, एम.डी.देशमुख, आर.डी.पाटील, शशांक अहिरे, हेमंत मालपुरे, पंकज पवार, शेखर निंबाळकर, चंद्रशेखर शिसोदे, एकनाथ माळदकर,प्रशांत गायकवाड, किरण पाटील, सचिन राणे, सुचित्रा पाटील, मिलिंद देवकर, अमोल गायकवाड,कृषी सेवक तुफान खोत व उपस्थित गाव प्रमुख व शेतकरी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस उपस्थिताचे आभार प्रदर्शन पाचपाटील सोमनाथ माळी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button