Chalisgaon

डोणदिगर येथे बीजप्रक्रिया कार्यक्रम संपन्न

डोणदिगर येथे बीजप्रक्रिया कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव : कृषि संजीवनी मोहीम कार्यक्रम बीज प्रक्रिया महत्व
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषी रत्न शेतकरी गट दोनदीगर तालुका चाळीसगाव येथे कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आले बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक या वेळी सरपंच साहेबराव पाटील व ग्रामपंचायत सद्यस्य शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री गोरख झुलाल पारधी यांचा प्रक्षेत्रावर या वेळी आत्मा चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार म्हणाले की पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करणे फार गरजेचे आहे बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत,बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. कंपनी कडून आलेल्या बियांण्याला गौचो सारख्या औषधांची बीजप्रक्रिया केलेली असते,आपण ते बियाणे लागवड करतो. आपल्या पिकावर कमी रोग पडावेत, तसेच नत्र, स्फुरद, पालाश स्थिरीकरण व विरघडवण्यासाठी विविध प्रकारच्या जिवाणू खतांची प्रक्रिया करावी.त्यात ऍझोटोबॅक्टर,रायझोबियम, पीएसबी, विविध प्रकारची बुरशी नाशके यांची बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदे होतात

बिजप्रक्रियेचे फायदे
जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
शेतकरी बंधू नी बियांण्याला बीज प्रक्रिया करून च बियाणे ची पेरणी करावी किंवा लागवड करावी. अशी बीज प्रक्रिये बाबत आत्माचे ज्ञानेश्वर पवार यांनी महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमास गावातील शेतकरी वर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button