Mumbai

12 वी चा निकाल…असा पहा आणि ह्या संकेतस्थळावर पहा…

12 वी चा निकाल…असा पहा आणि ह्या संकेतस्थळावर पहा…

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन करण्यासाठी वेगळी मूल्यांकन पध्दत उपयोगात आणली गेली.

अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

असा पहा १२ वी चा निकाल

Step 1 : MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahahsscboard.in
Step 2 : मुख्यपृष्ठावर ‘MSBSHSE HSC निकाल 2021′ या लिंकवर क्लिक करा
Step 3 : तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा ( परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव) आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा
Step 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
Step 5 : निकाल तपासा, ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत ठेवा.

येथे पहा कधी आहे निकाल

१२ वी निकाल २०२१ लिंक वर सुद्धा पाहू शकता |HSC result 2021 maharashtra board Direct links/websites

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण देण्यात आले आहेत.

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button