sawada

सावदा-फैजपूर रोडावर एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपितपणे सुरू असलेला बायोडिझेल पंपाला सिल : मात्र गुन्हा नोंदणीचा विषय यंत्रणा कडूनच थंडबस्त्यात

सावदा-फैजपूर रोडावर एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपितपणे सुरू असलेला बायोडिझेल पंपाला सिल : मात्र गुन्हा नोंदणीचा विषय यंत्रणा कडूनच थंडबस्त्यात

ठळक मुद्दे

सदरचा पंप रोडटच जागा ऐवजी एका मोठ्या ट्रान्सपोर्टच्या मागे चालविला जात होता.

सदरील पंप व त्याचे चालक / मालक विरुद्ध अद्याप गुन्हा दाखल नाही.

राज्यात रॉकेल बंदी मात्र रॉकेल मिश्रित बायोडिझेलची विक्री.

सदरील पंप भाडयाची जागेवर लपवून अवैधरित्या चालविला जात होता.

या गंभीर प्रकाराकडे थेट जिल्हाधिकारी जळगांव यांनी लक्ष देण्याची गरज.

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्ग वर फैजपुर ते रावेर दरम्यान सावदा येथे कायद्याचा कोणतच धाक न बाळगता परवानगी नसून अवैधरित्या थेट पंप टाकून जवळपास १८ ते २० हजार लिटर राकेल मिश्रित बायोडिझेल विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू होता यात पंप चालकांनी वारेमाप कमाई करून घेतल्याचे नागरिकांमध्ये उघडपणे बोलले जात आहे.

जवळपास १० दिवसापूर्वी रॉकेल मिश्रित बायोडिझेल सह इत्यादी ३ लाख पन्नास हजार किमतीचे साहित्य रावेर पोलिसांनी जप्त करून धडक कारवाई केल्याची घटना घडलेली होती.
यानंतर गेल्या गुरुवारी पोलिसांनी बायोडिझेल वाहतूक करणारी गाडी पकडून कारवाई करण्यासाठी महसूल विभागाच्या ताब्यात दिली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पुरवठा निरक्षक व सावदा मंडळ अधिकारी जैस्वाल यांना बोलावून पुढील कारवाई करणे बाबत सांगितले. मात्र यात महसूल विभागाने हात काढून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी कुचकामी भूमिका घेतल्याने परिणामी गुन्हा दाखल झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे तसेच पकडण्यात आलेले वाहनास सुद्धा सोडून देण्यात आले.

यानंतर सदरील फैजपूर ते सावदा दरम्यान एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मांगे गुपित पद्धतीने अवैधरित्या सुरु असलेल्या झुलेलाल बायोडिझेल पंपाला थेट पुरवठा निरीक्षक व सावदा मंडळ अधिकारी जैस्वाल यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता पंप अवैधरित्या चालवला जात असल्याची बाब समोर आल्याने सदरील पंपाचा पंचनामा करून त्याला जागीच सील केल्याची कारवाई करण्यात आली आहे.

बायोडिझेल पंप चालवण्या कामी दिल्लीपासून ते तालुक्या पर्यंत संबंधित सरकारी ११ विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याची अधिकृत माहिती असूनही थेट कायद्याला न जुमानता स्वतःचा मोठा आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने समरीत पावर मध्ये रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री करण्याचा गोरखधंदा संबंधित पंप मालक चालकांनी केला असूनही त्यांच्याविरुद्ध पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या तरतुदी सह कायद्याचे विविध कलमाखाली आज पावेतो कोणताच गुन्हा दाखल करण्यास महसूल विभागाकडून जानू पूर्वक संथगती दिसून येते.

सदरील झुलेलाल बायोडिझेल पंप अवैधरित्या रोड टच जागा ऐवजी सावदा येथील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपित पद्धतीने भाड्याने घेतलेली जागेवर का चालवला जात होता?
राज्यात रॉकेल बंदी असताना रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री चा प्रकार अतिशय चिंताजनक नाही का?.

सदरील बायोडिझेल मध्ये राकेल मिश्रित करण्याकरिता विक्री करणारे रॉकेलची प्राप्ती कशी मिळवतात. रॉकेल पुरवठा देणारे कोण? याची महसूल विभाग व पोलीस विभागामार्फत सखोल चौकशी होऊन अवैधरित्या पंप टाकून बायोडिझेलची विक्री करणाऱ्या पंप मालक चालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे असून. सदरील गुन्हा करणारे मोकाट फिरता कामा नये म्हणून या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी जळगांव यांनी लक्ष केंद्रित करण्याची अतिशय गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button