Manmad

एससी/एसटी असोच्या प्रयत्न मनमाड़ रेल्वे दवाखान्याला औषधे,पीपीई किट प्राप्त!

एससी/एसटी असोच्या प्रयत्न मनमाड़ रेल्वे दवाखान्याला औषधे,पीपीई किट प्राप्त!

मनमाड I आप्पा बिदरी

मनमाड़ रेल्वे दवाखान्याला लॉकडाउन मुळे दीड महिन्यापासून औषधाचा तुड़वड़ा होता,डायबेटिज,बीपी या आजारावरिल रेल्वे कर्मचारी तसेच पेंशनर यांना औषधे मिळत नव्हती.तसेच पीपीई किट थर्मल थर्मो मीटर नसल्यामुळे डॉक्टर्सना तपासणी साठी प्रचंड अडचन निर्माण होत होती. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे भुसावल विभागीय दवाखान्यातुन मनमाड़ रेल्वे दवाखान्याला औषधे पुरवठा बंद होता .या पार्श्वभूमीवर एससी/एसटी असो च्या वतीने सीएमएस भुसावल डॉ सामंत राय, एम एस डॉ श्रवणकुमार व सहाय्यक मंडल चिकित्साधिकारी डॉ क्षत्रिय मनमाड़ यांचेशी समन्वय साधुन भसावल येथून मनमाड़ दवाखान्याला औषधे प्राप्त करण्यासाठी यश मिळवले आहे.तसेच दवाखा न्यासाठी थर्मल थर्मामीटर, पीपीई किट उपलब्ध झाले आहे,यासाठी रेल्वे दवाखान्याचे चेतन बोरसे, सीएचआय विभागाचे विश्वनाथ जाधव,ज्ञानेश्वर सोनवाने,हरिभाऊ दराने,यांनी विभाग स्तरावर प्रयत्न केले.

तसेच याकामी एससी/एसटी असोचे झोनल अति सचिव सतीश केदारे, भुसावल मंडलचे अध्यक्ष सुधिर जंजाले, भुसावल ऑपरेटिंग शाखेचे अध्यक्ष वाल्मीक देहाड़े,मनमाड़ ओपन लाइनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड़, कारखाना शाखेचे सागर गरुड़ सुभाष जगताप,अर्जुन बागुल,प्रेमदीप खडताले,रोहीत भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button