Solapur

शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण काळाची गरज- भारत आबा शिंदे जि. प. सदस्य

शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण काळाची गरज- भारत आबा शिंदे जि. प. सदस्य

अरण केंद्रातील १७ शाळांची – शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण कार्यशाळा दि.१० व ११ मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण व तुळशी येथे दोन दिवस संपन्न झाली. या कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये केंद्रप्रमुख डाॅ. विलास काळे यांनी शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणाबाबत संदर्भात माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत झाल्याने नवं निर्वाचित सदस्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. शाळा विकास आराखडा तयार करणे साठी प्रशिक्षणातून व शालेय कामकाजा संदर्भात माहिती मिळणार आहे. असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे यांनी शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी शालेय अडचणी सोडविणे, शालेय विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, शालेय विकास आराखडा तयार करणे, शालेय कामकाजावर संनियंत्रण ठेवणे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
भारत आबा शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा अरण, हनुमान वाडी, गेंडवस्ती, चोपडे वस्ती या शाळांना जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत ई- लर्निंग साहित्य एल, ई. डी. टि.. व्ही.चे वाटप करण्यात आले. तसेच कार्यशाळा मार्गदर्शक बालाजी ढेंबरे आणि राजू बागल यांनी २ दिवस प्रशिक्षण सुलभक म्हणून कार्य केले. केंद्र अरण मधील शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण दोन टप्प्यांत अरण व तुळशी येथे घेण्यात आले. कार्यक्रमासाठी अरण गावच्या सरपंच -ताकतोडे मॅडम, तुळशी चे सरपंच प्रतिनिधी दिगंबर माळी, उपसरपंच शरद मोरे, माजी सरपंच पांडुरंग अण्णा गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -बळिराम दाजी अनपट, सुधीर काळे, बापूसाहेब दगडे, रमेश चोपडे, मनोज शहा , दत्तात्रेय दुधाने ,संदिपान ढेरे, प्रभाकर मोरे, चांगदेव मोरे, नामदेव ढेरे तसेच केंद्रातील सर्व शाळांचे अध्यक्ष, सदस्य, जयराम दगडे शांता वाघमोडे, विलास क्षिरसागर या सह सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम गोरे यांनी तर आभार प्रदर्शन राजन सावंत यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button