Rawer

शाळा हे विद्यामंदिर आहे ठेंगा सोसायटी नाही शिक्षकांची दांडी खपवून घेणार नाही- जि.प.शिक्षण आरोग्य सभापती रवींद्र(छोटू) पाटील

शाळा हे विद्यामंदिर आहे ठेंगा सोसायटी नाही शिक्षकांची दांडी खपवून घेणार नाही- जि.प.शिक्षण आरोग्य सभापती रवींद्र(छोटू) पाटील

दांडी बहाद्दर शिक्षकांना नोटीसा देण्याचे आदेश

रावेर/मुबारक तडवी

मोठा वाघोदा येथे जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापतींची भेट
जि प.मराठी उर्दु शाळांमध्ये भेट देऊन पाहणी
मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज जळगांव जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापतीं रविद (छोटू) सुर्यभान पाटील यांनी अचानक धावती भेट दिली या भेटी दरम्यान सरपंच मुबारक (राजू) अलिखा तडवी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन आरोग्य व शिक्षण सभापतीं रविद ( छोटू ) सुर्यभान पाटील यांचा माजी उपसरपंच राहुल भाऊ पाटील,ग्रामपंचायत सदस्य संजय माळी यांसह,सत्कार केला तसेच शिक्षण, आरोग्य सभापतीं यांनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळेत भेट देऊन पाहणी केली व शिक्षकांकडून समश्या जाणून घेतल्यानंतर तात्काळ तोडगा काढला व पुढील उपाय योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले अशाच प्रकारे जि.प.उर्दु शाळेला ही भेट देऊन पाहणी केली असता ८ शाळेतील शिक्षक ८ शिक्षकांपैकी फक्त चारच शिक्षक हजर होते मुख्याध्यापक व उपशिक्षक शाळेच्या कामानिमित्त गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गेलेले असल्याचे सांगितले एक वैद्यकीय कामी आणि एक प्रख्यात दांडी बहाद्दर शिक्षक विनाअर्ज रजेवर असल्याचे प्रत्यक्षदर्शी शिक्षण सभापती यांना दिसले त्यांनी भ्रमणध्वनीवर रावेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री दखने यांना सविस्तर माहिती दिली *शाळा हे विद्यामंदिर आहे ठेंगा संस्था नाही जिथे कधीही यायच आणि केव्हाही जायचं हे चालणार नाही कर्तव्यात कसूर खपवून घेणार नाही*तात्काळ या दांडी बहाद्दरशिक्षकांना नोटीस बजावण्यात याव्यात आणि उद्या स्वता अहवाल सादर करण्याचे सांगितले दरम्यान सरपंच मुबारक ( राजू ) अलिखा तडवी माजी उपसरपंच राहुल भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय काशिनाथ माळी आदी उर्दु शाळेच्या ६वी व ७वी अंगणवाडीसह तीन वर्ग खोल्यांसाठी वॉलकंपाऊंड मंजूर करण्याची मागणी सभापती महोदयांना केली असता त्यांनी वॉलकंपाऊंड मंजूर करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी उपसरपंच राहुल काशिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय काशिनाथ माळी,बाळू काकडे ग्रामसेवक नितीन महाजन ,मराठी, उर्दु प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकवृंद पंकज मालखेडे , सुनिल पाटील,अजय कराड भुषण नेहते ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button