Nashik

शाळा प्रवेशोत्सव

शाळा प्रवेशोत्सव

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : आज दिनांक ४/१०/२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जऊळके दिं. येथे इ. ५ वी ते ७ वी चे वर्ग शासन आदेशानुसार सुरू करण्यात आले. हा शाळा प्रवेश उत्सव आपल्या बीटाच्या शिक्षण विस्तार आदरणीय श्रीम.अहिरे एस. डी. मॅडम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात आल्या, फुगे व फुलांंच्या साहाय्याने शाळा इमारत सजविण्यात आली होती. ढोल, तासे व टाळ्यांच्या गजरात मुलांचे करण्यात आले व प्रत्येक विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प देण्यात आले.तसेच आदरणीय श्रीम. अहिरे मॅडम यांनी स्वतः विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले.प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल गन व ऑक्सिमीटर यांच्या साहाय्याने तपासणी करून त्याची नोंद ठेवण्यात आली. त्यानंतर कृती व हावभावयुक्त ,आनंददायी गाणी व विविध शारीरिक हालचाली करून घेण्यात आल्या. आदरणीय श्रीम. अहिरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कोविड-१९च्या काळात स्वतः ची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.उत्साहवर्धक प्रवेश प्रक्रिया बघून त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. दिर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेह-यावर पाहायला मिळाला. तसेच, विद्यार्थ्यांना डासांचा त्रास होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री आदेश गांगुर्डे यांनी ५ गुड नाईट मशीन शाळेला भेट दिली. शाळा प्रवेश उत्सव तयारी, विद्यार्थी उपस्थिती पाहून आदरणीय श्रीम अहिरे मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button