sawada

सावदा विज वितरण चे अभियंता श्री खांडेकर यांचा केला जात आहे *डिपार्टमेंटली फेवर*

सावदा विज वितरण चे अभियंता श्री खांडेकर यांचा केला जात आहे *डिपार्टमेंटली फेवर*

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा येथील वीज वितरण चे शहर कक्ष अभियंता एच.एल.खांडेकर यांना सेवेतुन निलंबित करण्यात यावे व कायद्या चे कलम 197 प्रमाणे त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करणे कामी परवानगी मिळावी या प्रमुख विषया खाली मुख्यकार्यकारी अभियंता सपकाळे यांचे कडे पुराव्यानिशी रितसर तक्रार केली असता महीना उलटून ही त्याची साधी दखल घेणयात आलली दिसत नाही.

सविस्तर वृत्त असे कि सावदा येथील गौसिया नगर भागातील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या मालकीची भव्य इमारतीचा बांधकाम करणे साठी एक वर्षा पासून सरकारी वीज तारां वर खाजगी वायर चा आकोडा टाकुन विज चोरी केली जात होती. याची पुराव्यानिशी तक्रार वार्ताहर युसूफ शाह सुपडू शाह यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सपकाळे यांना समक्ष भेटून केली असता त्या इमारतीवर छापा टाकण्यात आला. त्या वेळी शहर कक्ष अभियंता श्री खांडेकर यांनी वीज तारा वर टाकलेला खाजगी आकडा , कटर मशीन , पाण्याची मोटर इत्यादी साहित्य जप्त करून पंचनामा केल्याची चर्चा गावात सुरू होती.

त्या नंतर वीज चोरी करणाय्रा शैक्षणिक संस्थेला किती दंड आकारणयात आला याची माहीती कामी सावदा विज वितरण कार्यालयात वार्ताहर म्हणून गेलेले युसूफ शाह व शेख फरीद यांना येथील अभियंता खांडेकर यांनी माहिती न देता उडवा उडवी ची उत्तरे दिली व कारण नसताना थेट वाचाळ वक्तव्य करुन रागाच्या भरात आपण अधिकारी आहे याचे कोणतेच भान न ठेवता भाईगिरीचया भाषेत वाटेल ते धमक्या देऊन त्यांना तुच्छ वागणुक दिली या बाबत पुराव्यानिशी तक्रार देऊन ही महीना उलटुन सुध्दा वरिष्ठ अभियंता सपकाळे यांनी कोणतीच कायदेशीर कारवाई केलेली नाही हे एक मोठी शोकांतिका आहे. विद्युत अधिनियम व स्वतः चे कर्तव्य बाजुला ठेवून नऊ महिन्या पुर्वी अभियंता श्री खांडेकर यांनी रंगेहाथ पकडलेली वीज चोरी चा कोणताच दंड न आकारून सोडून दिल्या मागचे हेतू काय. या बाबत त्याची भुमिका संशयास्पद नाही का? व या मुळे वीज वितरण चा आर्थिक नुकसान झाले नाही त्याची ही कृती कर्तव्यात कसूर करणे असे गृहित धरण्यात येऊ नये? विद्युत अधिनियमा तील पळवाटीचा स्वतः च्या सोयी नुसार वापर करून प्रथम वेळी विज चोरीचा दंड सेटींग करून अल्प रकमेचा आकारणे महणजे कुंपणच शेत खात आहे असा होत नाही ना?

विद्युत अधिनियम 2003 प्रमाणे वीज चोरी उघडकीस करणाय्रां तक्रार दारास बक्षिस देण्या ऐवजी भाईगिरीच्या स्टाईल मध्ये धमक्या देण्या सदर अभियंतेचा कर्तव्य चा भाग नसुन त्याची भुमिका चोराला सोडून सन्याशाला फाशी देण्या चा प्रकार नाही का? नाही तर तक्रार देऊन वीज चोरी उघडकीस करणारे युसूफ शाह यांचे चुकले तरी कुठे ? या बद्दल येथील अभियंता ने सांगावे.कर्तव्य वर असतांना तोंडाला मासक न लावता कोरोना महामारी च्या काळात सरकारी नियम व अटीचे उललघन येथील अभियंता श्री खांडेकर यांनी केलेला नाही का? विज चोरी उघडकीस करणे जर तक्रार दाराच्या अंगलट येत असेल. पुरावे निशी मुजोर अभियंता विरुद्ध महिना पुर्वी केलेली तक्रार वर वीज वितरण च्या वरिष्ठांकडुन काही कारवाई केली जात नसेल चौकशी कामी तक्रार दारास काही एक सुचना पत्र वीज विभागा कडुन तक्रार दाराला येत नसेल , मुजोर अभियंता वर काय कारवाई करण्यात आली असा माहिती अधिकार अर्ज येथील वरीष्ठ अभियंता यांचे कडे करण्याची वेळ तक्रार दारावर येणे म्हणजे वीज वितरण विभागाचे वरिष्ठांकडुन अप्रत्यक्ष पणे त्यांचे असंवेदनशिल व बेजबाबदार अभियंतेचा डिपार्टमेंटली फेवर केला जात आहे. असे निदर्शनास येते.
सदर प्रकणाची जिल्हा पातळीचे विज विभागाचे मुख्य अभियंता यांनी दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई अशी अपेक्षा ओढग्रस्त तक्रार दाराने व्यक्त केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button