sawada

सावदा पालिका कडून शहर प्रभाग रचना प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना : नगरसेवक संख्येत होणार वाढ.

सावदा पालिका कडून शहर प्रभाग रचना प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना : नगरसेवक संख्येत होणार वाढ.

“जवळ येत असलेली पालिका निवडणुकीसाठी २० नगरसेवक तर १० प्रभाग होणार याची उत्सुकता वाढत आहे.उमेदवार देखील तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणासह येथील पालिका प्रशासन देखील तयारीला लागले आहे. यावेळी पालिका निवडणुकीकरीता मोठे व कमालीचे फेरबदल झाले असून प्रभाग सुद्धा वाढले असल्याचे दिसत आहे. प्रभाग रचना व त्यातील आरक्षणे यासाठी अधिकारी व कर्मचारी हे मोठी मेहनत घेत आहे”

प्रतिनिधी सावदा युसूफशाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे पालिका निवडणुक जवळ येत असल्याने तसेच शहरातील सध्याची लोकसंख्या २१५९७ इतकी असून त्यानुसार प्रभाग रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. एकूण १० प्रभाग असणार असून यात सरासरी २१४० तसेच किमान १९२६ व कमाल २३५४ इतकी मतदार संख्या राहील.

सावदा शहरात यापूर्वी १७ नगरसेवकांची संख्या होती.मात्र शासनाच्या धोरण व निर्णयानुसार सदस्य संख्या वाढल्याने शहरातील नगरसेवक संख्या आता ३ ने वाढून २० होणार व यासोबत प्रभाग संख्या ८ ऐवजी १० होणार असून प्रत्येक प्रभागातून २ सदस्य निवडून द्यावे लागतील.तसेच नगरसेवक संख्याबळ ३ ने वाढलेल्यामुळे इतर इच्छुकांच्या आशा मात्र आता अधिक पल्लवित झाल्या आहेत.

या प्रभात रचनेनुसार शहरात आता एस.सी प्रवर्ग २ जागा यात १ महिला राखीव,एस.टी प्रवर्ग.करीता १ जागा,ओ.बी.सी.५ जागा यात ३ महिला राखीव,जनरल महिला राखीव ६ व जनरल (खुला प्रवर्ग) ६ अश्या प्रकारे सर्वसाधारणपणे प्रभाग असणार असून याचा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आला.यावर कोणतीही हरकत व बदल न झाल्यास सदर प्रमाणे येथे प्रभाग असणार आहे. दरम्यान शहरातील पालिका निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवक सह माजी, तसेच नवीन चेहरे देखील इच्छुक दिसत असून सर्वांनी गुढग्यास बाशिंग बांधलेले दिसत असल्याने इच्छुकांची संख्या देखील मोठी असणार आहे.सदरील माहिती पालिका कार्यालयीन अधिक्षक सचिन चोळके यांनी दिली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button