sawada

सावदा न.पा.आरोग्य निरीक्षक महेश चौधरी यांच्यामागे अखेर आवळला चौकशीचा फास!

सावदा न.पा.आरोग्य निरीक्षक महेश चौधरी यांच्यामागे अखेर आवळला चौकशीचा फास!

“सौ.नंदाताई लोखंडे यांचे २६ जानेवारी रोजीचे उपोषण तहकूब”

तसेच आरोग्य निरीक्षक महेश चौधरी यांची वर्तणूक बाबत नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन एक जबाबदार अधिकारी म्हणून नागरिकांशी तुमचे सामंजस्य व सौजन्याने वागने राहील याची काटेकोरपणे दक्षता व नोंद घ्यावी.तसेच यापुढे आपल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होऊ नये.अन्यथा आपल्या विरुद्ध योग्यती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची सुद्धा दखल घ्यावी.असे लेखी समज वजा तंबी पत्र देखील आज पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी त्यास दिलेले आहेत.

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील नगरपालिकेचे आरोग्य निरक्षक महेश श्रीकांत चौधरी यांच्या कामाची चौकशी होणे बाबत वेळोवेळी दिलेल्या तक्रारीची संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने न्याय मिळणे कामी अखेर २६ जानेवारी २०२२ ला पालिकेसमोर उपोषण करण्याचे जिल्हाधिकारी सह मुख्याधिकारी कडे नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी निवेदन सादर केलेले होते.

सदरील निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,आरोग्य निरीक्षक महेश चौधरी हे ६०% अपंग असून त्यांनी नोकरी लागल्यापासून ते आज पावेतो घेतलेला प्रवास भत्ता अनियमित असेल तर ते वसूल करण्यात यावा. तसेच ते सुरुवातीला वाचमेन पदावर असताना आज रोजी ते आरोग्य निरीक्षक असून त्यांची साधारणता २ ते ३ वेळा पदोन्नती कशी झाली.शहरातील काही मालमत्ता धारकांकडे पूर्वीपासून शोच्छालय असून देखील त्यांना शोच्छालय बांधकामाचे अनुदान कसे वितरित केले.व सन २०११-१२ मध्ये शोच्छालय व्हक्युमच्या किती पावत्या फाडण्यात आल्या व याकामी डिझेल खर्च किती झाले आहे.तसेच सन २०११-१२ पासून ते आज पावेतोचा डीजल खर्च किती झालेला आहे.इत्यादी बाबीची चौकशी व्हावी.अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे यांनी दिलेला होता.

तरी नंदाताई लोखंडे यांच्या दिलेल्या निवेदनाला अनुसरून पालिकेच्या अभीलेखाची पडताळणी केली जाईल व यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती झालेली असून समितीचे अध्यक्ष पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके,सदस्य नगर अभियंता अविनाश गवळे,व कर अधिक्षक अनिल कुमार अहुजा आणि समितीला सहाय्यक करणेकामी लेखापाल विशाल पाटील यांना देखील समाविष्ट करण्यात आलेले असून त्याबाबत स्पष्ट अहवाल ७ दिवसात सादर करण्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आज दि.२५ जानेवारी २०२२ रोजी आपल्या कार्यालयीन आदेश पारित करून तसे लेखी पत्र संबंधित उपोषण करत्या सौ‌.नंदाताई लोखंडे यांना शहरातील पत्रकार युसूफ शाह, दिलीप चांदेलकर,फरीद शेख यांच्या उपस्थिती मध्ये दिल्याने त्यांनी २६ जानेवारी २०२२ चे उपोषण तुर्थ तहकूब केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button