Dhule

नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर एकविरा देवीच्या मंदिरास करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई

नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर एकविरा देवीच्या मंदिरास करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई

धुळे असद खाटीक

नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या एकविरा देवीच्या धुळे शहरातील मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
यंदा नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांच्या अंतर्गत नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे आणि त्यामुळेच यंदा दरवर्षीप्रमाणे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली नसणार आहे
परंतु दरवर्षी एकविरा मातेच्या मंदिरास विद्युत रोषणाई केली जाते त्या प्रमाणे विद्युत रोषणाई मंदिरास करण्यात आली आहे
विद्युत रोषणाई मुळे मंदिराचे दृश्य खूपच आकर्षक दिसत असून विद्युत रोषणाईने मंदिर अक्षरशः न्हाऊन निघाल्याचा भास होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button