sawada

दोन समाजात निर्माण होत असलेल्या तेढ संपवण्यासाठी सावदा पोलिसांनी घेतली शांतता बैठक

दोन समाजात निर्माण होत असलेल्या तेढ संपवण्यासाठी सावदा पोलिसांनी घेतली शांतता बैठक

“मिटींग दरम्यान चर्चा मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करत्यावेळी पोउनि.राजेंद्र पवार यांनी असे सुचविले की,वाद प्रसंगी महिलांची उपस्थिती या-ना त्या कारणाखाली वादास वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी ठरते.तरी वाद विकोपाला जाऊ न देण्याची काळजी सर्वांनी मिळून घेतली पाहिजे.जेणेकरुन शहराची शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सर्वांनी बांधीलकी जपावी.”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे भोई वाड्यातील टाकण्यात आलेल्या गतिरोधक वरुन दोन समाजाचे येथील परिसरात रहिवासी तरुणांमध्ये दि.२९ दिसेबंर २०२१ रोजी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास वाद होवून धक्का बुक्की झाल्याने त्यात एक तरुण पडला असता त्याच्या डोक्याला किरकोळ इजा झाली.त्यात दोन्ही समाजातील काही सुज्ञ नागरिकांनी सदर वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला.मात्र घटनास्थळी पोलीसांनी देखील वेळेवर येवून परस्थिती पुर्णपणे आटोक्यात आणली.एका गटाचे ४ तरुणांना ताब्यात घेतल्याने वातावरण शांत झाले होते.

मात्र यानंतर दि.३० दिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता भोई वाड्यातील काही माथेफिरू मानसिकता बाळगणाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याच्या पर्यत्न केला असता घटना स्थळी एपीआय देविदास इंगोले,पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार,पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड,पो.कॉ उमेश पाटील,देवेंद्र पाटील,हवलदार मेहमूद शहा,इत्यादींनी यांनी पोहोचून दुसऱ्या गटातील ६ तरूणांना ताब्यात घेतले.व ह्या माथेफिरू कडून शहराची बाधित होणारी शांतता अबाधित राखण्यास यशस्वी ठरले.हे मात्र खरे आहे.

तरी सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये,शहराची शांतता टिकून राहण्यासाठी थेट एपीआय देविदास इंगोले यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष सोनवणे मुक्ताईनगर यांच्या उपस्थितीत तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता सावदा पोलीस स्टेशनमध्ये गावातील दोन समाजाचे सुज्ञ लोकांना बोलवून घेतलेल्या मिटींग मध्ये नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी मार्गदर्शन केले.यानंतर दोन्ही समाजातील लोकांमध्ये चर्चा होवून सदरील वाद आपसात मिटवण्यात आले.यात हाजी सलीम दादा कुरैशी व गोपाळ भोई यांनी मोलाची भुमिका घेतली.यावेळी गजू ठोसरे,मधुकर चौधरी,शेख ईल्यास कुरैशी सर,अय्युब कुरैशी,सुरेश भोई,शंकर भोई,फत्तु शामा भोई,शेख फारुख कुरैशी सह पत्रकार दिलीप चांदेलकर,शाम पाटील,फरीद शेख आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button