Amalner

Amalner: महिला शिक्षण त्यांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला- मुख्याध्यापक अनिल महाजन

महिला शिक्षण त्यांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला-मुख्याध्यापक अनिल महाजन

अमळनेर प्रतिनिधी महिला शिक्षण, त्यांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला, समाजमन बदलताना नवा विचार दिला.
पुरोगामी महाराष्ट्रात फुले दाम्पत्य भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत यांच्यासारखे दुर्भाग्य कोणतेच नाही.ज्यांनी देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अशा सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलावर्गाला प्रेरणादायी आहे असे महात्मा फुले हायस्कूल देवगांव-देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के, शिक्षक एस. के महाजन एच,ओ माळी होते.
अगोदर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
इयत्ता आठवीतील भाग्यश्री पाटील ,गायत्री भिल, जयश्री पाटील, श्‍वेता बैसाने, वैष्णवी माळी ,

इयत्ता नववी
राजश्री पाटील ,प्रणाली पाटील ,भाग्यश्री पाटील, संजना पाटील ,स्नेहल पाटील, हर्षला पाटील, गायत्री पाटील

इयत्ता दहावी
वैशाली पाटील, रोशनी पाटील, श्वेता पाटील, गायत्री पाटील ,रजनी माळी, यशस्वी पाटील या सर्व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत गीत सादर केले.
स्काऊट शिक्षक एच. ओ.माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले.आभार प्रर्दशन एस.के.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button