Faijpur

फैजपूर सह परिसरात सट्टा मटक्याला उधान

फैजपूर सह परिसरात सट्टा मटक्याला उधान

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील फैजपूर सह परिसरात गेल्या काही महिन्यापासून सर्वत्र सट्टा मटक्याला उधान आले असून फैजपूर पोलिसांकडून कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या वर्षभरापासून फैजपूर सह फैजपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अठ्ठावीस गावांमध्ये सट्टा मटका काही दिवस बंद होता परंतु आता काही महिन्यांपासून सर्रासपणे बिनधास्त सट्टा मटक्याला उधान आले असून त्यामुळे मोलमजुरी
करणारे सट्टा मटक्याच्या आहारी जात असून त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे गेल्या वर्षभरात सट्टा मटका हा अनेकवेळा चालू आणि बंद झाला परंतु गेल्या चार महिन्यांपासून सट्टा मटका बिनधास्तपणे सुरू असून फैजपूर सह पोलिस स्टेशनच्या अठ्ठावीस गावांमध्ये सत्ता मटक्याला उधाण आले आहे या अठ्ठावीस गावांमध्ये अमोदा बामणोद पाडळसा म्हैस वाडी हंबर्डी हिंगोणा न्हावी मारुळ पिंपरुड मांगी करंजी साखर कारखाना परिसर बोरखेडा विरोदा लीधुरी या गावांचा समावेश आहे आज फैजपूर शहरात फैजपूर पोलिस आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईने शहरात अवैधरीत्या लावलेले बॅनर वरती कार्यवाही करण्यात येत आहे परंतु फैजपूर सह परिसरात बिनधास्तपणे सुरू असलेला सट्टा मटका या अवैध धंद्यांवर सुद्धा कायमस्वरुपी ची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button