Chopda

महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी सतिश गायकवाड यांची निवड…

महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी सतिश गायकवाड यांची निवड…

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : मुक्ताताई नगर येथे आज दिनांक ७ मार्च २०२१ ला शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमन शहा उस्मान शहा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांची बैठक आयोजित करुन सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी सतिश गायकवाड यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्याबद्दल सविस्तर असे कि महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे संघटन करुन अन्याय – अत्याचार झाल्यास सदैव पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटना काळजीपूर्वक प्रत्येक जिल्ह्यात आज तगायत करीत आहे बातमी संकलन करीत असताना येणारे वेगवेगळे अनुभव अधिकारी देत असलेली वागणूक पत्रकारांवर होणारे हल्ले असे एक ना अनेक विषयांवरती चर्चा करून संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमन भाई यांनी संघटनेचे महत्त्व व ध्येयधोरण पटवुन सागितले. जळगांव जिल्हाध्यक्ष पदी मोहन मेढे यांची तर जिल्हाउपाध्या पदी
मुबारक तडवी आणि शब्बीर भाई हिंगोणा यांची जिल्हा सचिव पदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुक्ताताईनगर तालुक्याची तालुका कार्यकारिणी देखील उपस्थित पत्रकार बांधवातुन घोषित करण्यात आली.

मुक्ताताईनगर तालुका कार्यकारणी:-
तालुका अध्यक्ष श्री सतिश गायकवाड, सचिव श्री अमोल वैद्य, शहराध्यक्ष श्री रिजवान भाई, शहरउपाध्यक्ष श्री अजगर शेख, तालुका संघटक श्री दिनकर भालेराव ,तालुका संघटक मुक्ताररब्बी, तालुका संघटक श्री कैलास कोळी, तालुका संघटक वसीम कुरेशी, या सर्व नवनियुक्त पत्रकारांचा संघटनेचे अध्यक्ष माननीय लुकमन भाई यांनी सत्कार करुन भावी वाटचालीचस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरण पार पडला. सुत्रसंचालन व आभार अजगर भाई यांनी मानले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button