Jalgaon

शहीद जवान मंगलसिंग परदेशी यांस साश्रु नयनांनी अखेरचा निरोप..!अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमला परिसर…!

शहीद जवान मंगलसिंग परदेशी यांस साश्रु नयनांनी अखेरचा निरोप..!अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमला परिसर…!

पाचोरा (जळगाव) सावखेडा बु.येथील सुपुत्र जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी वय 35 यांना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा करत असतांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण आले.आज १६ नोव्‍हेंबर वीर जवान मंगलसिंग परदेशी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद जवान मंगलसिंग परदेशी हे ७३४ टीपीटी (डब्ल्यूकेएसपी) येथे नियुक्तीस होते. १४ नोव्‍हेंबरला गेट नंबर दोनवर गार्ड ड्युटी बजावत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शहीद मंगलसिंग परदेशी यांना चार वर्ष सेवावाढ मिळालेली होती.

रांगोळी सडा आणि जवान अमर रहेचा नारा..

शहिद मंगलसिंग राजपूत यांचे पार्थीव आज सकाळी साडेआठ पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथून मिल्‍ट्रीच्या वाहनातून सावखेडा बु. या गावी आणण्यात आले. गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे मंगलसिंग राजपूत अमर रहे, भारत माता की जय..’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. शहीद मंगलसिंग परदेशी यांचा मुलगा चंदन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button