Kolhapur

सप्तरंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेनी जपली सामाजिक बांधिलकी

सप्तरंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेनी जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर : सप्तरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आदर्श महीला बचत गटाला मास्क वाटप करण्यात आले . समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्दात भावनेने ही मदत देत असल्याचे अध्यक्षा रोहीणी भोसले, सुभाष भोसले यांनी मास्क वाटप प्रसंगी सांगितले.
सध्याची कोवीड परिस्थिती पाहता ग्रामिण भागात कोवीड एक समस्या ठाण मांडून बसली आहे. ही समस्या निवारण व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
औषधे व मास्क वाटप अध्यक्षा रोहीणी भोसले, सुभाष भोसले, निलम खेबुडे, महेश खंडागळे, शीतल खाटुया, शिरीष केसरकर,गितांजली खोत यांनी आदर्श महिला बचत गटाला केले. यावेळी अध्यक्षा अनुसया खंडागळे यांनी संस्थेच्या उपक्रमा बद्दल आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button