Nashik

कोविड-19 आजाराने मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान लवकरच, मंजुरीसाठी सक्षम प्राधिकरण जाहीर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे

कोविड-19 आजाराने मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान लवकरच,
मंजुरीसाठी सक्षम प्राधिकरण जाहीर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक =कोवीड १९ कोरोना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वारस यांना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), जुना आग्रारोड, नाशिक-1, 0253-2315080 व 2317151 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे www.nashik.gov.in या संकेतस्थळावर आणि [email protected] या ई मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.

मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खाजगी व्यक्ति किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, याबाबत पैशांची मागणी झाल्यास वरील नमूद पत्त्यावर तक्रार करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button