Korpana

संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा भाजपाचे किशोर बावणे यांच्या वतीने दिव्यांगाना सायकल वाटप व जेष्ठांचा सत्कार

संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा भाजपाचे किशोर बावणे यांच्या वतीने दिव्यांगाना सायकल वाटप व जेष्ठांचा सत्कार

मनोज गोरे कोपरना

कोपरना : कोरपना येथील प्रभाग तीन येथे आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर बावणे यांच्या वतीने दिव्यांगाना सायकल वाटप व जेष्ठांचा सत्कार करण्यात आला.
कोरपना येथे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी पुसाराम डोंगे यांना इलेक्ट्रॉनिक सायकल भेट देण्यात आली तर जेष्ठ नागरीक कुंडलिक कारेकर, जेष्ठ शिक्षक गेडाम सर, आडते सर यांचा उपस्थित पाहुणेच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपाचे जेष्ठ नेते किशोर बावणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी किशोर बावणे, रमेश मालेकर,अमोल आसेकर, गेडाम सर, धुळे सर,डॉ साखरकर, प्रदीप पिंपळशेंडे, सुधाकर मोडक, पांडुरंग वरभे,आडते सर, शंभरकर सर, नवनाथ धारणकर,रमाकांत मालेकर,तुळशीराम वैरागडे,उलमाले बाबु,सुभाष तुरणकर,जेष्ठ नागरीक बिरबल गुजर, मोहन गेडाम,मंगेश कळसकर, गणेश कावडकर व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button