Yawal

केन्द्र शासन अंतर्गत पुरस्कृत महिला शक्ती केन्द्र समितीच्या सदस्यपदी स्वयंदिप प्रतिष्ठानचे सचिव संदीप पाटील यांची निवड

केन्द्र शासन अंतर्गत पुरस्कृत महिला शक्ती केन्द्र समितीच्या सदस्यपदी स्वयंदिप प्रतिष्ठानचे सचिव संदीप पाटील यांची निवड

यावल ( शब्बीर खान ) तालुक्यातील डांभुर्णी येथील रहीवासी तथा स्वंयदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव तथा सामाजीक आणी शैक्षणिक कार्यकर्ता संदीप निंबाजी पाटील यांची केन्द्र शासनव्दारे पुरस्कृत डीएलसीडब्ल्युबेटी बचाव बेटी पढाव या जिल्हापातळीवरील महीला समितीअंतर्गत महीला शक्ती केन्द्र समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे . जळगावचे जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली या केन्द्र शासन पुरस्कृत असलेल्या या जिल्हा पातळीवरील महीला शक्ती केंद्र निवड समितीत नोंदणीकृत अशासकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणुन डांभुर्णी तालुका यावल येथील शिक्षक संदीप निंबाजी पाटील यांची निवड करण्यात आली असुन, या पाच सदस्य असलेल्या जिल्हापातळी वरील या समितीच्या सदस्य सचिव म्हणुन जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांची निवड झाली आहे . महीला विषय कार्यरत नोंदणीकृत अशासकीय संघटनेच्या प्रतिनिधी म्हणुन श्रीमती राजेश मनिषा खडके यांची आणी सदस्यपदी नरेन्द्र बाळु पाटील निवड करण्यात आली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button