Nashik

लळिगं येथील लांडोर बंगला भीमस्मृर्ती ला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित करा.- समाजभूषण – जितु बागुल.नाशिक युवा जिल्हाध्यक्ष.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांची मागणी

लळिगं येथील लांडोर बंगला भीमस्मृर्ती ला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित करा.- समाजभूषण – जितु बागुल.नाशिक युवा जिल्हाध्यक्ष.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक :- धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती ठेवून उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८५ वर्षे पूर्ण होत आहेत दरवर्षी ३१ जुलैला या ठिकाणी ‘भीमस्मृती यात्रा’ भरविली जाते
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाज व देशासाठी दिलेल्या भरीव योगदानात एक सुवर्णपान खानदेशाच्या वाट्याला आले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्यां पदस्पर्शाने पुनित झालेल्या धुळे- खानदेश भूमीचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे. जुन्या-नवीन पिढीने आदराने व अभिमानाने जोपासलेला हा अनमोल ठेवा आजही नगरवासीयांना आनंदित, पुलकित करीत आहे. लळिंग किल्ल्यावरील ‘लांडोर’ बंगल्यात बाबासाहेबांचे वास्तव्य आणि दीनदलितांना दिलेला मौलिक संदेश परिवर्तनवादी वाटसरूला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहे. प्रेरणा देत आहे

लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यातील बाबासाहेबांचे वास्तव्य हे आज खऱ्या अर्थाने स्मृतिस्थळ बनले आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेशातील असंख्य भीमसैनिक या पावन स्थळी आपली भेट देतात.म्हणून या सरकार कडे आम्ही अशी मागणी करीत आहे . या भिमस्मृर्ती ला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी जितु बागुल नाशिक युवा जिल्हाध्यक्ष. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button