Khandala

पोत्याची थप्पी अंगावर पडल्याने संदीप धायगुडे (रा.मोर्वे.वय 24 ) यांचा मृत्यू

पोत्याची थप्पी अंगावर पडल्याने संदीप धायगुडे (रा.मोर्वे.वय 24 ) यांचा मृत्यू

खंडाळा प्रतिनिधी दिलीप वाघमारे

प्रिमीयम चिक फीड कंपनी अहिरे ता.खंडाळा येथे पोत्याची थप्पी अंगावर पडल्याने संदीप धायगुडे (रा.मोर्वे.वय 24 ) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि, प्रिमीयम चिक फीड या कंपनीत कामगार म्हणून कामाला असताना मका भरलेले पोती गाडीतुन खाली करत असाताना एकजण पाणी पिण्यासाठी गेले असता अल्प विश्रांती साठी पोत्याच्या थप्पीखाली बसले असता अचानक भरलेले पोते अंगावर पडल्याने संदीप धायगुडे गंभीर जखमी झाले. यानंतर लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी अखेर संदीप धायगुडे या युवकाची प्राणज्योत मावळली.

ही घटना 9 जानेवारी गुरुवारी अहिरे गावाच्या हद्दीतील प्रिमीयम चिक फीड या कंपनीत घडली होती. दरम्यान मयत संदीप धायगुडे यांच्या वडिलांनी मयत मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय दिल्याने,ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात आले. संदीप धायगुडे हा घरातला मोठा मुलगा होता.यामुळे,या कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button