Pandharpur

समृध्दी ट्रॅक्टर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केला अनोखा उपक्रम

समृध्दी ट्रॅक्टर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केला अनोखा उपक्रम

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : स्त्री शक्तीचा कर्तुत्वाचा गौरव, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समृद्धी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून एकूण ३३ कुटुंबातील महिलांना रुपये ११,०००ची FD करून देण्यात आली असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आज प्रत्येक कुटुंबातील स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने हा लहानसा उपक्रम समृद्धी ट्रॅक्टर यांनी हाती घेतला.त्यावेळी सांगोल्याच्या श्रीमती सिंधुताई बाळासाहेब माने, करकंबच्या श्रीमती वृषालीताई दिलीप खारे, कडलासच्या श्रीमती प्रियांकाताई गणपती जाधव, श्रीमती बाकाबाई धुरा सरक, चिखलगीच्या श्रीमती अश्विनी गुदलिंगप्पा उमराने, बलवाडीच्या श्रीमती पूजा सोमनाथ पालसंडे या महिलांना FD करून देण्यात आली.यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button