Mumbai

NCB अधिकारी समीर वानखेडेंवर ठाकरे सरकारकडून ठेवली जातेय  पाळत..!

समीर वानखेडेंवर ठाकरे सरकारकडून ठेवली जातेय पाळत..!

समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे

मुंबई बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शन मुळे समीर वानखेडे हे चर्चेत आहेत.आधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात समीर वानखेडे यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली चौकशी यामुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले आणि आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज विरोधी कारवाईमुळे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे चर्चेत आहेत.

याच दरम्यान आणि प्रकरणामुळे समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली.

तर विरोधी पक्षांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दिलीप वळसे पाटील आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी समीर वानखेडे यांच्या तक्रारीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी हा खुलासा केला. समीर वानखडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलही आदेश दिलेले नाहीत. अशी कुणावर काही पाळत ठेवली जात नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button