Pimpale Guraw

सह्याद्री आदिवासी जेष्ठ नागरिक संघाचे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

सह्याद्री आदिवासी जेष्ठ नागरिक संघाचे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पिंपळे गुरव / प्रतिनिधी – महादेव कोकणे

सह्याद्री आदिवासी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक याच्या उपस्थितीत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नवी सांगवीतील आदिवासी समाज कृती समितीचे कार्यालय येथे पार पडली.
सभेत मागील आर्थिक वर्षाचा ताळेबंद चे वाचन करण्यात आले.आदिवासीच्या समस्या मुद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र नसणाऱ्या नोकरी मिळणार नसणार असताना चोपडा मतदार संघात आमदार सौ. लता सोनवणे यांनी अनुसूचित जात वैधता प्रमाणपत्र नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढू नये असा पवित्रा घेतल्याने बोगस उमेदवारांना बाबत जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेत निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी सभेस जेष्ठ नागरिक संघाचे चेअरमन डी. बी.घोडे ,प्रकाश केंगले, अँड. सुदाम मराडे, सेक्रेटरी कृष्णा बालचीम, एम. के. कोकणे, विठ्ठल कोथिरे, सौ. मंगल घोडे मँडम आदी ची उपस्थिती होती.
यावेळी सभेचे सूत्रसंचालन अँड. सुदाम मराडे यांनी केले तर आभार विठल कोथिरे यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button