Amalner

Amalner: सागर कोळी या युवा नवोदित कवीच्या कवितेला जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात द्वितीय क्रं…

सागर कोळी यांचा जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात झाला सन्मान..

अमळनेर
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ, आणि राष्ट्रीय कला मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन ‘प्रतिभा संगम’ 2022 या कार्यक्रमात सागर सुकदेव कोळी, कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय , मारवड तृतीय वर्ष कला चा विद्यार्थी मराठी कविता या कला प्रकारामध्ये त्यांनी स्वलिखित कविता सादर केली.
परिक्षक तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक कोतवाल , महाराष्ट्र राज्य कलामचं सहसंयोजक प्रसाद जाधव, कार्यक्रम प्रमुख भूमिका कानडे,व मान्यवरांचे हस्ते सागर कोळी या युवा कवीला द्वितीय क्रमांक देऊन गौरवण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या यशाचे अभिनंदन मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक व संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button