Maharashtra

स्वेरीच्या विद्यार्थ्यांना परदेशातून करिअर विषयक ऑनलाईन मार्गदर्शन

स्वेरीच्या विद्यार्थ्यांना परदेशातून करिअर विषयक ऑनलाईन मार्गदर्शन

पंढरपूर- स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना आज शुक्रवार दि. ८ मे रोजी ‘आखाती देशातील पेट्रोलीयम उद्योगातील करिअरच्या संधी’ या विषयावर सीनियर पायपिंग डिझाईन अभियंता

प्रतिनिधी रफिक आतार

सुजित फुटाणे (ओमान) यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सुद्धा मोलाचे असते. स्वेरीचे संस्थापक सचिव तथा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी नामवंत कंपन्यांतील मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आयोजित केले जाते. सध्या मस्कत (ओमान) येथे वास्तव्यास असलेल्या सुजित फुटाणे यांनी गुगल मीट अॅप्लीकेशन च्या माध्यमातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. या वेबिनार मध्ये स्वेरीच्या एकूण १४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अभियंता सुजित फुटाणे यांनी मार्गदर्शन करताना ‘आखाती देशातील पेट्रोलियम कंपन्यांमध्ये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये सुद्धा भारतीय अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.’ असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर त्यांनी परदेशांमध्ये नोकरी करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात कशी करावयाची याबद्दलही सविस्तर माहिती दिली. सदर ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा.विक्रम चव्हाण, प्रा. सचिन खोमणे, प्रा. चेतन जाधव, प्रा. कपिल जुंधळे, प्रा. रामेश्वर सोळगे, प्रा. सचिन काळे, विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे, प्रा. अमित शिंदे, प्रा. सुभाष जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अभियंता फुटाणे यांना कोरोनामुळे परदेशी नोकऱ्यांवर परिणाम होणार का? त्याचबरोबर भविष्यातील रोजगारसंधी संबंधी प्रश्न विचारले असता त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. करिअर संदर्भात असे मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित केल्याबद्दल पालक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
छायाचित्र – स्वेरीचे संस्थापक सचिव तथा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी लोगो आणि मस्कत, ओमान मधील मिडल ईस्ट कन्सल्टन्सीचे वरिष्ठ पायपिंग डिझाईन अभियंता सुजित फुटाणे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button