World

Russia Ukraine War: सोन्याच्या दरात उसळी..! का वाढतील सोन्याच्या किंमती..!जाणून घ्या कारण..!

Russia Ukraine War: सोन्याच्या दरात उसळी..! का वाढतील सोन्याच्या किंमती..!जाणून घ्या कारण..!

रशियाने युक्रेन वर हल्ला केल्याने सर्वच क्षेत्रात त्याचे परिणाम दिसून येत आहे. अचानक पण सोन्याच्या दरात उसळी आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1935 डॉलरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये (MCX) वर सोन्याच्या किमती 1400 रुपये प्रति ग्रॅमने वाढल्या असून सोन्याचा भाव 51,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. किंबहुना, जागतिक तणावामुळे सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.कच्च्या तेलाने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा ओलांडला तर त्यासोबतच सोन्याच्या किंमतीही भडकल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल,असे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते.

सोने महाग का होत आहे?

जगभरात आधीच महागाई वाढली आहे आणि आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विविध देशांच्या केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवू शकतात.यानंतर आरबीआयकडूनही (RBI) व्याजदर वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजारात घसरण दिसू शकते, त्यानंतर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाचवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू शकतात.त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी केल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमधील डोन्बास प्रांतावर हल्ला केला आहे. त्यानंतर रशियन फौजांनी डोन्बासकडे कूच केली. वर्ष 2014 पासून हा भूभाग युक्रेन सरकारच्या नियंत्रणाबाहेर असून त्यांनी स्वत: ला स्वतंत्र प्रजासत्ताक घोषित केले आहे. या भूभागाला रशिया आणि बेलारूसने मान्यता दिली आहे. डोन्बासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 15000 लोकांचा मृत्यू झाला असल्याचा युक्रेन सरकारने दावा केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button