World

Russia Ukraine War:महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले..!पहा जिल्हा निहाय संख्या..आणि हेल्पलाईन नं…जळगाव मधील 9 विद्यार्थी…!

Russia Ukraine War:महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले..!पहा जिल्हा निहाय संख्या..आणि हेल्पलाईन नं..

युक्रेनमध्ये अडकले महाराष्ट्रातील अंदाजे १,२०० विद्यार्थी.

एकूण ३०० विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी झाला संपर्क.

राज्य सरकारने जारी केली हेल्पलाइन.

मुंबई यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील अंदाजे १ हजार २०० विद्यार्थी अडकल्याची माहिती हाती आली आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. काल रात्री रोमानियाहून एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. तसेच आणखी ३०० विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रोमानियाहून भारताकडे रवाना झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील सुमारे १ हजार २०० विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी

यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील अंदाजे १ हजार २०० विद्यार्थी अडकल्याची माहिती हाती आली आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाला असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.

या बरोबरच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि [email protected] या ईमेलवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असेही विभागाने जाहीर केले आहे.

पहा जिल्हा निहाय यादी..

१. पुणे – ७७
२. नांदेड – २९
३. लातूर – २८
४. रायगड – २६
५. अहमदनगर – २६
६. ठाणे – ११
७. उस्मानाबाद – ११
८. सोलापुर – १०
९. जळगाव – ९
१०. रत्नागिरी – ८
११. अमरावती – ८
१२. पालघर – ७
१३. जालना – ७
१४. सातारा – ७
१५. नाशिक – ७
१६. औरंगाबाद – ७
१७. सिधुदुर्ग – ६
१८. परभणी – ६
१९. बुलडाणा – ६
२०. चंद्रपूर – ६
२१. कोल्हापूर – ५
२२. जळगाव – ५
२३. नागपूर – ५
२४. अकोला – ४
२५. भंडारा – ४
२६. गोंदिया – ३
२७. बीड – २
२८. यवतमाळ – २
२९. गडचिरोली – २
३०. गडचिरोली – २
३१. हिंगोली – २
३२. वर्धा – १
३३. धुळे – ०

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button