Maharashtra

भूखंड प्रकरण..!एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी..!

भूखंड प्रकरण..!एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी..!

मुंबई 2016 मधील गाजलेले भूखंड प्रकारणात आता मोठा धक्का राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना बसला आहे.खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळला आहे असे टि्वट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. तसेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे मंदाताई खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे.सध्या तरी एकनाथ खडसे यांना वैद्यकीय कारणामुळे दिलासा आहे.

एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या चौकशीत आहेत.या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. तर या व्यवहारात मदत केलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी ईडीने अटक केली आहे त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी ठेवली आहे.

काय आहेभोसरी भूखंड प्रकरण?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला होता.या भूखंड 3 कोटी 75 लाख रूपयांना विकत घेतला होता.पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू झाली मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आणि आता मंदा खडसे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता यावर खडसे कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button