Baramati

आरपीआय पारधी समाज आघाडीचे प्रांत कार्यालयावर जाहीर आंदोलन

आरपीआय पारधी समाज आघाडीचे प्रांत कार्यालयावर जाहीर आंदोलन

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामती उपविभागातील असणाऱ्या पारधी समाज्यातील लोकांचा सर्वांगीण विकासासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने 25 संप्टेंबर रोजी बारामती प्रांत कार्यालयावर जाहीर निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार आहे असे सूतोवाच आरपीआय पारधी समाज आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार यांनी ठोस प्रहार प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील असणारा पारधी समाज अजून तळागाळातच आहे.आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजना पारधी समाज्यातील लोकांपर्यंत पोहचतच नाही.बारामती उपविभागात मलिदा खाणारे अनेक लोक आहेत.त्यांना पारधी समाज्याचे लेणे देने नाही.राज्याचा कारभार हा बारामतीतूनच चालतो हे सर्वश्रुत आहे,त्यामुळे पारधी समाज्याने आत्तातरी जागे होऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आरपीआय पारधी समाज आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार मनोगत व्यक्त केले.
त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले की पारधी समाज्यातील लोकांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावे,आदिवासी विभागाच्या सवलती पारधी समाज्यास त्वरित लागू करण्यात याव्यात,पारधी समाज्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल आहेत ते रद्द करण्यात यावेत,माळेगाव मधील पारधी बांधवांचे अनेक घरे जळून खाक झाली आहेत ते बांधून देण्यात यावेत असे अनेक मागण्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button