Nashik

पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकरी वर्गाला त्वरीत मिळावा रिपाई चे जिल्हा उपध्यक्ष बापुराज खरे यांची निवेदनद्वारे मागणी,

पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकरी वर्गाला त्वरीत मिळावा रिपाई चे जिल्हा उपध्यक्ष बापुराज खरे यांची निवेदनद्वारे मागणी,

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 2000 रुपये मानधन ब्राह्मणगाव तालुका येथील बॅंक ऑफ बडोदा येथील खात्यात नवीन खाते नंबर अपडेट न झाल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा न झालेले किसान सन्मान निधी दोन हजार रूपये नसल्यामुळे बॅंक ऑफ बडोदा येथील संबधित शाखा अधिकारी व वरीष्ठ पदाधिकारी यांनी नवीन खाते नंबर त्वरित अपडेट करून शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित 2000 रुपये वितरित करण्यात यावे, या मागणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण च्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच बापुराज खरे तसेच ग्रामपालिकेचे जेष्ठ सदस्य श्री.अरुण दादा अहिरे, विनोदबापू अहिरे,रत्नाकर दादा अहिरे, केदाभाऊ ढेपले, सामाजिक कार्यकर्ते धर्मा पारखे,रमेश व्यापार, दुर्गेश परदेशी, शामा माळी, प्रकाश बिरारी, डांगल,यांच्या हस्ते निवेदन ब्राह्मणगाव बडोदा बँक शाखेचे व्यवस्थापक श्री.राहुल देवरे यांना देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button