Amalner

भास्करराव पेरे यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब अमळनेरचा ६५ वा पदग्रहण सोहळा संपन्न !

भास्करराव पेरे यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब अमळनेरचा
६५ वा पदग्रहण सोहळा संपन्न !

अमळनेर – अमळनेर नगरीत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तसेच नावारूपास आलेल्या रोटरी क्लब अमळनेरचा दि.८ ऑगस्ट रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र शासनाच्या कोरोनसंबंधी संपूर्ण नियमांचे पालन करून बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे नुकताच पार पडला.
अमळनेर येथील रोटरी क्लबचे नूतन पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहन सोहळा पाटोदे जि.औरंगाबाद गावाचे सरपंच मा.श्री.भास्करराव पेरे पाटील तसेच रोटरी क्लबचे उपस्टिंट गर्व्हनर रो.राजेशजी मोर,पाचोरा तसेच जळगांव ग्रामिणचे चेअरमन रो.एम.डब्ल्यु पाटील यासोबतच कार्यक्रमाला रोटरीक्लब चोपडा,पाचोरा व
अमळनेर येथील अनेक रोटेरियन उपस्थित होते.

रोटरी क्लब हे सुध्दा आगळे वेगळे आकर्षण अमळनेरकरांना असल्याने त्यांनी
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून पाटोदे गावचे सरपंच मा.श्री.भास्करराव पेरे पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगरीत आणून वेगळे काहीतरी करून दाखवले आहे.भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवून एक।वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष रो.अभिजीत भांडारकर यांच्याकडून नूतन अध्यक्ष रो.ऋषभ पारख यांनी पदभार स्विकारला तर सेक्रेटरी पदाचा कार्यभार हा रो.प्रतिक जैन यांनी स्विकारला.सोबतच या प्रसंगी नविन मेबरईन्डक्शन झालेले
रो.ऍड गोपाल सोनवणे,रो.अजय मुंदडा,रो.आशिष वर्मा,रो.डॉ.कौस्तुभ वानखेडे यांचाही सत्कार करण्यत आला.

रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष अभिजीत भांडारकर यांनी मागील वर्षातील समाजासाठी रोटरी क्लबने केलेल्या विविध कामांचा चढता आलेख हा श्रोत्यांसमोर,पदाधिकाऱ्यांसमोर मांडला.कोरोनाच्या महामारीत रोटरी क्लबने समाजासाठी व ग्रामीण रूग्णालयात अतिआवश्यक असे लागणारे विविध साहित्यांची मदत तर केलीच परंतु गरजू रुग्णासाठी अनमोल मदत केली आहे.याचा उदाहरणासहीत दाखला मान्यवरांनी यावेळी दिला.”आपण समाजाचे काही देणे लागतो” या उदात्त भावनेने शहरतील विविध रोटरीयन परिवाराने या काळात मदत केली यात बोथरा परिवाराने तसेच निकम परिवारांने केलेल्या मदतीसाठी या परिवारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच महाविद्यालयीन जीवनात अनेक विद्यार्थी हे उत्तुंग यश संपादन करत असतात अशा महाविद्यालयात तसेच विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही रोटरी क्लब कडून सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.मान्यवर प्रमुख पाहुणे भास्करराव पेरे पाटील, आमदार अनिल पाटील यांनी रोटरीच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेतली व रोटरीच्या कार्याची दखल घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.अजय रोडगे,डॉ.दिशा जैन,डॉ.निशा जैन यांनी केले कार्यक्रमाला रोटरी क्लबचे रो.महेश पाटील यांच्यासह अनेक रोटेरियन उपस्थित होते.या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या कोरोनारबंधीचे सर्व नियम
पाळण्यात आले तर या कार्यक्रमाचा शेवट हा वसुंधरा लांडगे यांनी पसायदान सादर करून केला.असे रोटरी क्लबचे पी.आर.ओ रो.ताहा बुकवाला व रो.धीरज अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिले.

संबंधित लेख

Back to top button