Nashik

CRIF व PMGSY च्या रस्ते कामांचे ना.डॉ.भारती पवार यांचे हस्ते होणार उदघाटन

CRIF व PMGSY च्या रस्ते कामांचे ना.डॉ.भारती पवार यांचे हस्ते होणार उदघाटन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

केंद्रीय मार्ग निधी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निफाड तालुक्यासह येवला व लासलगाव मंडळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांचे उदघाटन सोमवार दि.14 फेब्रुवारी रोजी आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामांना मंजुरी मिळावी याकरिता स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचे कडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दळणवळण करणे देखील जिकिरीचे झाले असता ह्याबाबत ना.डॉ.पवार यांनी गंभीर दखल घेत खलील रस्ते कामांचा दिल्ली येथे पाठपुरावा करून मंजूर करून आणले असून त्या रस्ते कामांचे उद्या सोमवार दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. ह्या रस्ते कामांमुळे तालुक्यासह परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
मा.ना.डॉ.भारती प्रवीण पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या प्रयत्नातुन
१. दात्याने, जिव्हाळे ते शिरसगाव रस्ता ( किमी ६.२००) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे ता. निफाड (रक्कम ४१४.१९ लक्ष)
२. नैताळे ते रामपूर कोळवाडी, सोनेवाडी बु. ते प्रजीमा-६४ निफाड रस्ता (किमी ३.८००) ची सुधारणा करणे ता. निफाड
(रक्कम २५७.२९ लक्ष)
३. प्रजीमा-२७ (भूसे) ते म्हाळसाकोरे, तारुखेडले रस्ता (किमी ३.३००) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे ता. निफाड
( रक्कम २१४.७५ लक्ष)
४ . नांदूर मधमेश्वर ते धारणगाव खडक – बोकडदरे रस्ता (किमी ५.३२०) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे ता. निफाड
( रक्कम ३३५.९० लक्ष)
५. केंद्रीय मार्ग निधी (CRIF) योजना अंतर्गत मंजूर कानळद ते देवगाव प्रजीमा २६१ रस्ता ते भरवस फाटा ची सुधारणा करणे (किमी १४.२००) ता. निफाड ( रक्कम ७१२.६९ लक्ष) झाली आहे.
ह्या कार्यक्रमास
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य,सर्व गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन व सदस्य उपस्थित राहणार असून ह्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी
उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, नाशिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर, निफाड भाजपा तालुकाध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, लासलगाव मंडल भाजपा अध्यक्ष डी.के.नाना जगताप यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button