Baramati

रस्त्यावर खड्डा दिसता कामा नये..

रस्त्यावर खड्डा दिसता कामा नये..

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका कर्मचारी यांना सूचना दिल्या. अनेकदा सूचना देहूनही ही कामे सुरू होत नसल्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या शैलीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
बारामती नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने,जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हा परिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्याची कामे तातडीने हाती घ्यावीत असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.दरम्यान बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व काँक्रीटीकरनाच्या 82 कामाच्या तीन निविदाना मंजुरी मिळाली असून या सर्व कामाच्या वर्क ऑर्डर संबधीत कंत्रादारांना दिलेल्या असून ही कामे काही ठिकाणी सुरू झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली.
जवळपास 14 कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत.तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button