Bhusawal

नाहाटा महाविद्यालयात माहितीचा अधिकार कार्यशाळेला सुरुवात

नाहाटा महाविद्यालयात माहितीचा अधिकार कार्यशाळेला सुरुवात.

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

भुसावळ : भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात तीन दिवशिय “माहितचा अधिकार” कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, उपप्राचार्य ए. डी. गोस्वामी, प्रमुख वक्ते डॉ. आर. एस. नाडेकर, समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल हिवाळे तसेच कार्यालय प्र. रजिस्ट्रार श्री. भगवान तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाला वंदन करून करण्यात आली.या कार्यक्रमात प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी भारतीय लोकशाही आणि माहितीचा अधिकार, या विषयावर मार्गदर्शन केले.दिनांक 12 ऑक्टोबर 2005रोजी माहितीच्या अधिकाराची प्रत्यक्षा अंबलबजावणी करण्यात आली. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आपल्या भारताची राज्यघटना स्थापित आहे. भारतीय लोकशाहीत भारतीय नागरिक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. सध्याच्या आधुनिक युगात संगणकीय क्रांतीमुळे माहितीच्या अधिकाराला प्रचार व प्रसार होण्यास मदत मिळाली. माहितीच्या अधिकारामुळे समाजात पारदर्शकता निर्माण होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. त्याचप्रमाणे व्यक्तिला आपल्या आयुष्यात स्वतःच्या हक्कांची व
अधिकारांची जाणीव होते. या गोष्टींचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांनी बोलतांना माहितीच्या अधिकाराचे महत्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांचे मार्गदर्शना नुसार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ. किरण वारके, डॉ. ममताबेनपाटील प्रा. व्ही. ए. सोळुंके, डॉ. विलास महिरे, डॉ. सचिन कोलते यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही .ए. सोळुंके यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. ममता पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button