Rawer

रावेर पंचायत समितीला माहिती अधिकार कायदा लागू नाही?

रावेर पंचायत समितीला माहिती अधिकार कायदा लागू नाही?

“गटविकास अधिकारी हे माहिती अधिकार कायद्याला न जुमानता मागणी केलेली माहिती ज्याच्याशी निगडित आहे त्यांच्याशी त्यांचे अर्थपुर्ण संबंध तर नाही ना?की सदरील कायदा पंचायत समितीला लागूच नाही? किंवा त्या व्यक्तीला राजकीय अभय की सदरचा प्रकार गटविकास अधिकारी यांच्यापासून लपविला तर जात नाही.असे प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहे.”

सावदा तालुका रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सत्यता समोर आण्याकामी माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत नोव्हेंबर २०२१ मध्ये अर्ज सादर करून एका महिला उपशिक्षक बाबतची मागितलेली माहिती नियमानुसार ३० दिवसात अर्जदाराला देण्यात आली नसल्याने यासंदर्भात अर्जदाराने माहिती अधिकार अधिनियम नुसार मुदतीत पंचायत समितीच्या संबंधित अपिलीय अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रथम अपील अर्जची मुद्दत देखील संपली.मात्र आजपावेतो माहिती अधिकार अधिनियम नुसार मुदतीत कोणतीही माहिती व लेखी उत्तर रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांच्याकडून अर्जदार तथा अपीलकर्ता युसूफ शाह सुपडू शाह रा.सावदा यांना देण्यात आले नाही.हे मात्र खरे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button