Atpadi

श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा ..

श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा ..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :वाढदिवस म्हटलं केक, फुगे, आतिशबाजी अनं पार्ट्यांसह धांगडधींगा अशा अनेक गोष्टी आल्याचं. मात्र याला अपवाद ठरलंय ते वनगळी येथील पारेकर कुटुंब.या सर्व बाबींना बगल देत त्याच वाचलेल्या पैशातून श्री दत्तात्रय नागनाथ पारेकर यांनी गावातील वनविभागामध्ये श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह दत्तात्रय पारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव साठी पाणी सोडले . वाढदिवसाची आठवण आयुष्यभर लक्षात राहील अशा सामाजिक कार्याची नोंद केली आहे.

सध्या संपुर्ण देशात २४ मार्च पासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आलाय. उन्हाळ्यात मुळे वन्यजीव वर मोठं संकट ओढावलेयं.स्व विलास फाऊंडेशन च्या वतीने . देशावरील संकटात ख-या अर्थी समाजहित जोपासत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिरालाल पारेकर उपसरपंच पांडुरंग पारेकर विक्रीकर निरीक्षक नवनाथ पारेकर सुनिल पारेकर दत्ता पारेकर अतुल पारेकर रोहन पारेकर गणेश गुटाळ, काळेल साहेब दिग्विजयसिंह पारेकर विश्वतेजसिंह पारेकर वैष्णवी पारेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पञकार श्री रवींद्र खोरकर व भुषणसिंहराजे होळकर यांचाही वाढदिवस यानिमित्ताने दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील मयुरेश्वर अभयारण्यामध्ये हरणे भरपूर असून या ठिकाणी पाणवठे आहेत याठिकाणी टॅंकरने पाणी सोडण्यात आले यावेळी सरपंच विकास विधाते, विठ्ठल सोडनवर सर, औंदुबर कोकरे, महेश कोकरे, राहूल कोकरे, रविंद्र खोरकर, महेश गडधे पाटिल, सचिन परशे, श्रीकांत हंडाळ, किरण बारवकर इ. उपस्थित होते. औंदुबर कोकरे व राहूल कोकरे यांनी पाण्याची सोय उपलब्ध करुण दिली.

आटपाडी येथीही आज ऐतिहासिक होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत युवराज भूषणसिंह होळकर महाराज साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलिस स्टेशन आटपाडी येथे आपल्या कायदा सुरक्षितेसाठी सदैव तत्पर असणार्या पोलिस बांधवांना मरहट्टी इतिहास संशोधन विकास मंडळाचे सदस्य श्री दिपकराव थोरात विवेक पावणे तसेच पोलिस पाटील संजय थोरात, सुहास शिंदे
व . सुभाष पुकळे यांचे वतीने मास्क व सॅनिटाईसर चे वाटप करण्यात आले . त्यावेळी आटपाडी पोलिस स्टेशन चे ए. पी. आय मा.गबाले साहेब व मा. पाटील साहेब यांचेकडून मास्क व सॅनिटाईसर सुपूर्द करण्यात आले.

Leave a Reply

Back to top button