Atpadi

आरग हायस्कूल आरगमध्ये RJ हर्षदा ची धमाल, महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

आरग हायस्कूल आरगमध्ये RJ हर्षदा ची धमाल, महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी राहुल खरात

आरग एज्युकेशन सोसायटीचे, आरग हायस्कूल आरग जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या विद्यालयाचा महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून My Fm च्या RJ हर्षदा व मी सक्षमा सांगली जिल्हा फाऊंडेशनच्या संयोजिका गीतांजली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.आरग हायस्कूल आरगमध्ये Rj हर्षदा ची धमाल, महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.विद्यार्थ्यांनी शालेय दशेतच स्वतःमध्ये चांगले गुण आत्मसात करावेत मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा आधुनिक विज्ञानाची माहिती घेण्यासाठी मोबाईल हे माध्यम गरजेचे आहे. असे, मी सक्षमा फाउंडेशनच्या सांगली जिल्हा संयोजिका गीतांजली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.आरग हायस्कूल आरगमध्ये Rj हर्षदा ची धमाल, महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.यावेळी My Fm च्या RJ हर्षदा यांनी मुला – मुलींच्या साठी विविध गेम्स घेऊन शालेय विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. या मध्ये विविध गेम्स घेण्यात आले. व उत्तेजनार्थ विजेता सहभागीना बक्षीस देण्यात आले. RJ हर्षदा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हसाण्या गाण्याचे ही मनोरंजन केले. तर काही शालेय मुलींनी आपल्या आवाजात गाण्याचा ताल धरला. विविध गाणे गाऊन महिला पालकांची मने जिंकली. यावेळी नामवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक व बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते.गीतांजली पाटील म्हणल्या, मुलींनी समाजात राहताना आपली संस्कृती जपावी संस्कृतीला जपून कार्य करावे. मुलगा मुलगी असा भेदभाव न मानता,दोघांना सारखे समजावे. आपला पाल्य हा आईला व वडिलांना सारखाच असतो असे पाटील म्हनाल्या.यावेळी कृष्णाकांत कोरवी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हुक्किरे, पर्यवेक्षक श्रीकांत गायकवाड, पत्रकार निरंजन सुतार, सांस्कृतिक विभागाचे उज्वला गुरव, पाहुण्यांची ओळख आर.व्ही.पाटील यांनी तर सर्वांचे आभार एस.बी. वंजारी, तसेच सूत्रसंचालन एन.जी. तांदळे, जे. व्ही.पवार, पी.जी कोरे, एस.पी.पाटील, आर.जी.पाटील, एस. सी. मेरडे, एस.आर.पाटील, सुनिता पंढरीनाथ पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला ग्रामस्थ, महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Back to top button